सर्बियाचा टेनिसस्टार नोव्हाक जोकोविच आणि महिलांमध्ये एलेना रायबाकिनाने पटकावले विम्बल्डन विजेतेपद.

0
slider_4552

लंडन :

सर्बियाचा टेनिसस्टार नोव्हाक जोकोविचने रविवारी ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा 4-6, 6-3, 6-7, 7-6 असा पराभव करत सातव्या वेळी त्याने विम्बल्डन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

पहिला सेट 4-6 अशा फरकाने गमावल्यानंतर 35 वर्षीय जोकोविचने शानदार पुनरागमन करत सलग तीन सेट जिंकून विजेतेपद पटकावले. 2022 मधील जोकोविचचे हे पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद आहे, ज्याने 2021 मध्ये तीन विजेतेपदे जिंकली आहेत.

तत्पूर्वी महिलांच्या अंतिम सामन्यात रशियात जन्मलेल्या पण कझाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एलेना रायबाकिनाने विम्बल्डन स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. अंतिम लढतीत एलेनाने ट्यूनिशियाच्या ऑन्स जबेरवर 3-6, 6-2, 6-2 अशी मात केली.रिबाकिनाचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. 17व्या मानांकित कझाकिस्तानच्या रिबाकीनाने एक तास 48 मिनिटे चाललेल्या अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित ट्युनिशियाच्या ओन्स जेबुआरकडून पहिला सेट गमावून पुनरागमन केले. यासह रिबाकिना विम्बल्डनचे विजेतेपद जिंकणारी कझाकिस्तान आणि आशियातील पहिली खेळाडू ठरली आहे.दरम्यान, ट्युनिशियाची 27 वर्षीय जेबुआर ही अरब आणि आफ्रिकन देशांतून अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली महिला ठरली.

See also  रोहित शर्मा झाला टी-20 नंतर एकदिवसीय संघाचा कर्णधार