बाणेर :
बाणेर येथील निकिता जितेंद्र सुपेकर यांची इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग डेहराडून येथे एम टेक इन रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस साठी निवड करण्यात आली आहे.
या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तिचा देशामध्ये दुसरा क्रमांक लागला असून यासाठी देशभरातून सहा जणांची निवड करण्यात आली आहे.




तिने कोल्हापूर विद्यापीठातून नॅनो टेक्नॉलॉजी मधून पदवी तर पुणे विद्यापीठातून एम एस सी पर्यावरण शास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांनी निकिता सुपेकर यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, आपल्या बाणेर गावचे नाव निकिताने देश पातळीवर झळकावले आहे. तिच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो आहे. भविष्यात देखील तिने अजून उंची गाठावी यासाठी शुभेच्छा आहे.








