प्रभाग क्रमांक १२ व १३ मध्ये मतदार यादी मध्ये गोंधळ, गणेश कळमकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली तक्रार.

0
slider_4552

बाणेर :

प्रभाग क्रमांक १२ व १३ प्रारूप प्रभाग रचना आराखडा तयार करण्यापासून ते मतदार यादी तयार करण्यासाठी अधिकारी यांची नेमणूक करण्यातही राजकीय हस्तक्षेप करण्यात येतोय. यासाठी भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी थेट राज्य निवडणूक आयोग, पुणे मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली लेखी तक्रार केली आहे.

याबद्दल माहिती देताना भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर म्हणाले की, प्रभाग क्रमांक 12 व 13 चे प्रभाग करण्यापासून ते मतदार यादी तयार करणाऱ्या अधिकारी यांची नेमणूक करण्यातही राजकीय हस्तक्षेप करण्यात येतोय. प्रभाग रचनेत गोंधळ तर केलाच आता मतदार यादीतही गोंधळ घातला जात आहे.

याबद्दल माहिती घेताना गणेश कळमकर पुढे म्हणाले की, सुस गावातील यादी न 93, 94, 95, 96, 97 मध्ये मतदार यादीत हेड नाहीत, मतदारांची अपूर्ण नाव आहेत, पत्ते नाहीत. तसेच विधाते वस्ती, सदाफुली पार्क येथील प्रभाग क्रमांक 12 यादी क्रमांक 53, 54, 55, 56 मधील नाव प्रभाग क्रमांक 13 मध्ये घेतली गेलीत, असा प्रचंड गोंधळ याद्यांमध्ये दिसून येत आहे.

गेल्या वर्षभर माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी अश्विनी लांघी मॅडम, अभिजित भुजबळ आणि मधूकर थोरात या अधिकाऱ्यांच्या कामकाज विषयी तक्रारी दिल्या त्याच अधिकारी वर्गाची नेमणूक मतदार याद्या सूचना हरकरी विषयी निवडणूक प्रकिया मध्ये नेमणुका करण्यात आल्या. पुणे मनपा आयुक्त यांनी ह्या विषयी डोळ्यावर पट्टी बांधली असून त्यांना काहीच चुकीचे दिसत नाही का ? त्यांचा नक्की संजय कोण असा प्रश्न कळमकर यांनी विचारला आहे.

ह्या सर्व गोंधळा विरुद्ध गणेश कळमकर यांनी थेट राज्य निवडणूक आयोग, पुणे मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली लेखी तक्रार तर केली आहे. पण इते न्याय न मिळाल्यास पुराव्या सह मतदार यादीतील गोंधळ कोर्टात मंडणार आहे असे कळमकर यांनी सांगितले. अधिकारी दुर्लक्ष करतात म्हणून प्रत्येक तक्रार कोर्टात मांडावी लागते अशी खंत कळमकर यांनी अधिकारी वर्गापुढे मांडली.

See also  बाणेर येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला श्री भैरवनाथ मानाच्या गदेचा मानकरी..