राज्यपाल प्रकरणी १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक…

0
slider_4552

पुणे :

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राजचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट दिसून आली.

या वक्तव्यावर शिवसेनेचे ठाकरे गट, राष्ट्रवादी, उदयनराजे भोसले आक्रमक झाल्याचं दिसून आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता हा वाद पुन्हा एकदा चिगळण्याची शक्यता आहे. १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक देण्यात अली आहे.

त्यातच राजभवनातील एका मॅडेलचा फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला. या सर्व घटनांवर आता पुण्यात सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. पुण्यातील पुरोगामी संघटना आणि महाविकास आघाडीच्या वतीने १३ तारखेला पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्या अगोदर १० डिसेंबर रोजी भव्य सन्मान यात्रा निघणार आहे.

यामध्ये सर्व विरोधी पक्ष सामील होणार आहेत. भाजपनं महाराष्ट्राची माफी मागावी आणि राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवावे या मागणीसाठी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. तर महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीकडून मुंबईमध्ये १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये सर्व महाराष्ट्र प्रेमींनी सहभागी व्हावं असं आवाहन मविआच्या नेत्यांकडून करण्यात आलं आहे.

See also  सहकार क्षेत्राचा केवळ राजकीय वापर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन