बालेवाडी :
जनकल्याण रक्तपेढी, बाणेर बालेवाडी पाषाण रहिवासी संघटना, बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन आणि आदित्य ब्रिझ सोसायटी यांनी एकत्र येऊन भव्य रक्तदान शिबीर शनिवारी आयोजित केले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जवळपास 66 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराला वय वर्षे १८ ते वय वर्षे ६५ च्या महिला व पुरुषांनी रक्तदान केले. ह.भ.प. संजय तात्या बालवडकर यांचे हस्ते उद्घाटन झाले. नियमित रक्तदान करून फिट रहा व कुणाचा तरी जीव वाचवा असे सांगून त्यांनी सर्व आयोजकांचे कौतुक केले.
या वेळी रोहित बालवडकर, डॉ. सुधीर जोशी, बाणेर बालेवाडी मेडिको असोशियशन चे अध्यक्ष डॉ.राजेश देशपांडे, सुदर्शन जगदाळे, लहू बालवडकर, आबासाहेब कांबळे, मिलिंद जोशीराव, मोरेश्वर बालवडकर, वेंकट पोट्टरू व अनेक मान्यवरांनी शिबिरात सहभागी होऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या. जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.कांबळे यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्ल सर्व आयोजकांना धन्यवाद दिले.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे मिलिंद जोशीराव आणि त्यांचा मुलगा अनिश वय १८ तसेच सचिन कैलाजे व त्यांचा मुलगा आदित्य वय १८ यांनी एकाच वेळी रक्तदान केले. बालेवाडी येथील मधुबन सोसायटीतील प्रसाद यांचा आज वाढदिवस होता त्यांनी आवर्जून रक्तदान केले.
आयोजकांतर्फे अश्विनी मोड्ये, रमेश रोकडे आणि सारंग बाबळे यांनी शिबिर यशस्वी केल्याबद्दल सर्व रक्तदाते , सर्व कार्यकर्ते, सोसायटी स्टाफ यांचे आभार मानले आहेत.