सुसगाव :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल च्या सुस शाखेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यातआल्या.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल व संचालिका सौ. रेखा बांदल तसेच गाजलेले गायक इंडियन आयडियल फेम सुरेशजी कदम, झी युवा फेम व गायिका प्रांजली बर्वे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित महिला मान्यवरांचा तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा देखील महिलादिनाच्या निमित्ताने शाळेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
महिला दिनाच्या निमित्ताने इंडियन आयडियल फेम सुरेश कदम व प्रांजली बर्वे यांच्या गाण्यांची सुरेल मैफिल आयोजित केली होती. एक से बढ़कर एक हिंदी व मराठी फार्मायीशी गाण्यांचा सुरेल कार्यक्रमाचा मनमुराद आनंद सर्व महिलांनी मनसोक्त लुटला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी महिला दिन का साजरा करतात त्या मागचा इतिहास मोजक्या शब्दात सांगून समस्त महिलांना शुभेच्छा देऊन सर्व घर सांभाळून जबाबदारीची धुरा पेलावणाऱ्या समस्त महिलांप्रति आदर व्यक्त केला व महिला दिन हा रोजच असतो आज फक्त शुभेच्छा देण्याचा दिवस असे सांगून सगळ्या महिलांना शुभेच्छा दिल्या.
तसेच संचालिका सौ रेखा बांदल यांनी स्त्री शक्तीचा जागर व नारीशक्ती ची विविधता रूपे व वेगवेगळे पैलू अत्यंत हळुवारपणे उलगडून समस्त स्त्रीशक्तीला व आजच्या नारीला खरंच शतशः प्रणाम करून महिलांप्रति सदिच्छा व्यक्त केली.
महिला दिनानिमित्त सर्व शिक्षक महिलांना सुविचाराचे पुस्तक अशी आगळीवेगळी भेट देऊन गौरविण्यात आले.
काही शिक्षिकानी स्वतःचे मनोगत व्यक्त केले. काहींनी स्वतःमधले सुप्त गुण व कला सादर केल्या. सर्व महिलांच्या कलागुणांना वाव देत शुभेच्छा देऊन महिला दिनाचा कार्यक्रम शिस्तबद्ध रीतीने संपन्न झाला. शाळेतर्फे अल्पोपहराचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी व माधुरी धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. सर्व महिलांनी आजचा महिला दिन कायम स्मरणात राहील असे प्रतिपादन करून शाळेचे व मुख्याध्यापिका व सर्व आयोजक यांचे मनापासून आभार मानले.