जिंकलो किंवा हरलो तर त्याने काही फारसा फरक पडत नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
slider_4552

पुणे :

प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रथमच पुणे दौऱ्यावर आले होते.

या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, निवडणूक म्हणजे एकाची हार आणि एकाची जीत, हे अपेक्षितच असते. जिंकलो किंवा हरलो तर त्याने काही फारसा फरक पडत नाही. मात्र, कोणत्याही गोष्टीच्या विजय किंवा पराजयानंतर आम्ही त्याचे मूल्यमापन करतो. दुसर्‍या भाषेत सांगायचे झाल्यास आम्ही पोस्टमार्टेम करतो. आम्ही ते केले असून, यापुढे आम्ही काळजी घेऊ.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पराभव केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आज प्रथमच पुणे दौऱ्यावर आले होतो. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आज पुन्हा एकदा ईडीकडून छापा टाकण्यात आला. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मला याबाबत काहीही माहिती नाही. माध्यम प्रतिनिधींकडूनच मला ही माहिती मिळाली आहे.

See also  नागरिकांना लस घेण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा : अजित पवार