औंध मधून चंदनाचे झाड चोरीला…!

0
slider_4552

औंध :

औंध येथील कुमार प्रेरणा सोसायटी जवळील चौकात असलेले चंदनाचे झाड शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान चोरीला गेले आहे. ही चोरी मात्र झाड तोडी करणाऱ्या पैकी कोणीतरी लक्ष ठेवून केली असल्याचे लक्षात येत आहे. सात ते आठ इंच बुंदा असलेले हे झाड तोडून त्याचा बुंधा चोरी करण्यात आला आहे.

औंध येथील कुमार प्रेरणा सोसायटीच्या सीमा भिंतीला लागून रस्ता रुंदीकरण मध्ये हे चंदनाचे झाड होते. त्यासोबत इतरही दोन-तीन झाडे या ठिकाणी आहेत. परंतु त्यातील नेमके चंदनाचे झाड कोणीतरी अज्ञात चोरले असल्याचे लक्षात येत आहे. रस्ता रुंदीकरणांमध्ये ही झाडे तोडण्यात येणार होती अशी माहिती ही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. झाड तोडणाऱ्याला नेमकी ही झाडे तुटणार आहेत याची माहिती असून बरोबर चंदनाचे झाड या ठिकाणाहून तोडून करण्यात आले आहे.

याबाबत येथील स्थानिक नागरिक नाना वाळके यांनी महानगरपालिकेत तक्रार दिली असून चोरावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. चंदन चोरी हा गुन्हा असून याबाबत पोलिसांनीही लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी ही त्यांनी यावेळी सांगितले.

चंदन चोरणारा पुष्पा नेमका कोण…?
चंदनाचे झाड चोरीला गेल्यानंतर हा चंदन चोरणारा औंध मधील पुष्पा नेमका कोण अशी चर्चा मात्र या चौकात सुरू होती. जो कोणी असेल त्यावर ठोस कारवाई करण्याची मागणी मात्र नागरिकांनी केली आहे.

 

See also  नव्या कल्पनांमुळे विज्ञानाला विकसित होण्याची संधी मिळते : डॉ. विजय भटकर, श्री. स्वामी समर्थ औंध पुरस्कारा'चे वितरण