12 ऑगस्टला होणार पुण्याच्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण : चंद्रकांत पाटील

0
slider_4552

पुणे :

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला भेट देऊन पाहणी केली.  उवरित काम गतीने पूर्ण करावे आणि उद्वाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकार्यांना दिल्या.

यावेळी प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दीपक पोटे, अमोल बालवडकर, माजी नगरसेविका अल्पना वर्पे, आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणाच्या उड्ाणपुला प्रकल्पाचे काम अंतिमटप्यात असून येत्या 12 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीन गड़करी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. या पार्भूमीवर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने चंद्रकांत पाटील यांनी चांदणी चौक येथे भेट दिली.

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्यासो डविण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात उड्ाणपूल, सेवा रस्ता उभारण्यात येत असून, सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आहे. लवकरच सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रकल्प संचालक संजय कदम यांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली. पुणेकरांसाठी चांदणी चौक हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे त्याचे उरवरित काम जलदगतीने पूर्ण करावे. त्यासोबतच कामात कोणतीही त्रुटी राहू नये, याची खबरदारी घ्यावी. पावसाची शक्यता लक्षात घेऊन उद्धाटन कार्यक्रमाचे नियोजन करावे, अशा सुूचना यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकार्यांना दिल्या.

See also  संतश्रेष्ठ तुकाराम महाराजा व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे पुण्यात आगमन