सिंहगड किल्ल्याजवळ बिबट्याचे दर्शन…पर्यटकांना ॲलर्ट जारी!

0
slider_4552

पुणे :

महाराष्ट्रातील पु्णे शहराच्या जवळ असणाच्या सिंहगड़ किल्ल्याच्या जवळील भागात बिबट्या आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे वनविभागाने किल्ला बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना ॲलर्ट जारी केला आहे. हा बिबट्या किल्ल्याच्या कल्याण दरवाजाजवळ आला असल्याची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी साडे सहाच्या सुमारास कल्याण दरवाजाच्या जवळ असणाच्या मोरदरी गावात काही स्थानिकांना बिबट्या दिसला. यानंतर बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी त्वरित वनसंपर्क विभागाला कळवली. यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला पकडण्याचा बंदोबस्त केला. अद्याप हा बिबट्या वनविभागाच्या हाती लागला नसून तो जवळील जंगलात शिरला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचा इशारा वनविभागाने दिला
आहे.

दरम्यान सिंहगड किल्ल्यावरून रोज हजारो पर्यटक ये जा करत असतात. मात्र आता या ठिकाणी जाताना पर्यटकांना काळजी घ्यावी लागणार आहे.

See also  सरकार हमी भाव कायदा आणणारा का? : मेधा पाटकर