पुढील 48 तासात पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीच्या अतिक्रमणावर कारवाई करा : आमदार महेश लांडगे

0
slider_4552

पुणे :

पुणे शहरातील कसबा पेठ भागात असलेल्या हटविण्यात यावे.या मागणीसाठी पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीने पुणे महापालिकेच्या बाहेर भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. आमदार महेश लांडगे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी महेश लांडगे म्हणाले की,पुण्येश्वर मंदिराच्या परिसरात अनधिकृतपणे मशिद असून त्या ठिकाणी इमारत देखील उभारण्यात आली आहे.ते अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश आहेत.तरी देखील महापालिका आयुक्त विक्रम कुमार कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही.त्यामुळे पुढील 48 तासात कारवाई करण्याचा विक्रम न दाखवल्यास,आम्ही अयोध्येत जाऊन बाबरी मशिद पडू शकतो.

तर पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण पडू शकतो.त्यामुळे आम्हाला कायदा हातामध्ये घेण्यास भाग पडू नका. त्यामुळे पुढील 48 तासात पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.

See also  सर्व सामान्यांना आर्थिक मदत कशी मिळणार ? : चंद्रकांत पाटील