पुणे :
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने पुणे शहर,(Pune) मावळ व शिरूर या तीन लोकसभा मतदार संघातील एकूण 10 मतदार संघांकरीता मतदान होणार आहे.
त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागणीनुसार रविवारी (दि.12) व सोमवारी (दि.13) या कालावधीत 818 बसेस देण्याचे नियोजन केलेले आहे.
त्यामुळे येत्या रविवारी व सोमवारी पुणे व पिंपरी-चिंचवड शहर, शहरालगत ची उपनगरे व पीएमआरडीए हद्दीतील मार्गांवर बसेसचे प्रमाण कमी राहणार आहे.
त्यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते.तरी नागरिकांनी त्यानुसार त्यांच्या कामाचे नियोजन करुन स्वतःची गैरसोय टाळावी, असे आवाहन पीएमपीएमएल तर्फे करण्यात आले आहे.