बाणेर :
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी “अमोल बालवडकर क्वीक रिस्पॉन्स टीम” ही संकल्पना लवकरच लोकसेवेत सुरु केली जाणार आहे.
प्रशासन व नागरिक यामधील समन्वय साधुन नागरिकांच्या तक्रारीचा मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करुन समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न नव्या पद्धतीने केला जाईल. हल्लीच्या काळात वेळेला खूप महत्त्व आहे प्रभागातील नागरिकांच्या समस्या कमीत कमी वेळेत सोडवण्याच्या दृष्टीने ही संकल्पना नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या मार्फत अंमलात आणणार आहे.
केवळ फोनच्या मार्फत आपण आपल्या समस्या आमच्या टीम पर्यंत पोहचवू शकता व यावर तात्काळ कार्यवाही करत त्यांच्यामार्फत आपल्याला मदत केली जाईल. यामध्ये नागरिकांचे समाधान व्हावे हाच प्रामाणिक प्रयत्न आमोल बालवडकर करत आहेत.
नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा कायमच प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. पण आता ध्येय फक्त समस्या सोडवण्याचे नसून त्या कमी वेळेत सोडवण्याचे असेल. प्रभाग स्मार्ट होत असताना प्रभागातील समस्या सुद्धा स्मार्टपणे हाताळाव्या याव्यात ! QRT हि काळाची गरज असुन लवकरच मला सुचलेली ही संकल्पना मी प्रत्यक्षात जनतेच्या सेवेसाठी लवकरच आणत आहे, असे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मॅक न्यूज सोबत बोलताना सांगितले.