नवी दिल्ली:
कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलक शेतकऱ्यांचा रोष अद्याप कमी झालेला नाही. येत्या ६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी आंदोलंन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियन (आर)चे बलबीरसिंग राजेवाल यांनी दिली आहे. या दिवशी रात्री १२ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रस्ते रोखण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रसरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील दोन महिन्याहून अधिक काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या विषयावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी केंद्रसरकार व आंदोलक शेतकऱ्यांमध्ये चर्चेह्या १२ बैठक झालेल्या आहेत. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही.