बालेवाडी :
बाणेर – बालेवाडी मधील राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक व बूथ अध्यक्षांना मतदार याद्यांचे वाटप रविवार ३१/१/२०२१ रोजी सायंकाळी ६ वा माऊली बंगला बालेवाडी गावठाण येथे संपन्न झाले .
या वेळी कोथरुड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी बूथ अध्यक्षाने कशा पद्धतीने मतदार यादीवर काम करायचे याच्या बद्दल मार्गदर्शन केले. प्रभाग क्र ९ चे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी मार्गदर्शन करताना सागितले की मागील १४ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना बाणेर आणि बालेवाडी या दोन्ही गावात एक सारखाच विकास करण्याचा प्रयत्न केला, नागरिकांचे प्रश्न सोडविताना त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली, कोणाचीही कधीही अडवणूक केली नाही . यादीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांचे विचार व ध्येय धोरणे समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविली पाहिजे .
या प्रसंगी नितीन कळमकर, ज्योतीताई सुर्यवंशी, संतोष चव्हाण, बालम सुतार, अशोक बालवडकर, गणपतराव बालवडकर, पोपटराव बालवडकर, नितीन बालवडकर, मिलिंद बालवडकर, किसन बालवडकर, राजाभाऊ बालवडकर, विशाल विधाते, मनोज बालवडकर, विष्णु बालवडकर, अशोक कांबळे, गौतम कांबळे, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . डॉ. सागर बालवडकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.