बाणेर नागरी पतसंस्थेतर्फे सिंधुताई सपकाळ यांचा सत्कार.

0
slider_4552

बाणेर :

बाणेर नागरी पतसंस्थेतर्फे सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. गेले अनेक वर्षे सिंधुताई सपकाळ कित्येक अनाथ मुला मुलींचा सांभाळ करत आहेत. या त्यांच्या भरीव सामाजिक कार्याबद्दल त्यांना भारत सरकार तर्फे पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल बाणेर नागरी पतसंस्था तर्फे फुलांचा गुच्छ देऊन सिंधुताई सपकाळ यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. बाणेर नागरी पतसंस्था आपल्या पाठीशी कायम आहे असे बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप मुरकुटे  यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, लॉकडाउनच्या कालावधीमध्ये सर्व बंद असताना आश्रमातील मुलांचे देखील काही प्रमाणात हाल झाले. मला बाहेर कोणत्याही कार्यक्रमांना जाता येत नव्हते त्यामुळे आश्रमास मिळणारा निधी बंद झाला होता. या परिस्थितीतून उभारण्यासाठी आश्रमास सर्वांनी मदत करावी असे आवाहन सिंधुताई सपकाळ यांनी यावेळी केले.

यावेळी बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक डॉ. दिलीप मुरकुटे, विजय विधाते, अॅड. पांडुरंग थोरवे, दिलीप शेलार, शशिकांत दर्शने, सुदाम मुरकुटे, राजू शेडगे, डॉक्टर राजेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

See also  प्रकाश बालवडकर यांच्या सहकार्याने बालेवाडी येथे मोफत लसीकरण मोहीम