गणेशखिंड :
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात MAGN-IT हा कार्यक्रम BBA(CA) डिपार्टमेंट तर्फे गेली ९ वर्ष सातत्याने घेत आहे.हा कार्यक्रम अंतर महाविद्यालयिन असून त्यात वेगवेगले उपक्रम घेण्यात येतात. या वर्षीच्या कार्यक्रमाची सुरवात ऋचा बिडवाई हिच्या गणेशवंदनाने झाली. यानंतर IQAC प्रमुख प्रा पराग शहा यांनी स्वागतपर भाषण दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमेय निसाल ( Manager, m Capgemini, Pune ) यांनी स्व:ताचे गुण दोष ओळखून करिअर निवडा व पुढे जा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. प्राचार्य डॅा. संजय खरात यांनी ज्ञान वाढविण्यासाठी स्वयम NPTL सारखे आँनलाईन फ्लॅटफाँर्म वापरा असे सांगितले. या वर्षी या कार्यक्रमात ई flyer , विडियोग्राफी , वेबोमेट्रिक्स या स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी जज्ज म्हणून डॅा गौरी कोपार्डेकर, प्रा प्रेरणा सुरु, डॅा दिपाली मेहेर यांनी काम केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिता मकेश, नियती नाईक यांनी केले. प्रा प्रीती देशमुख, प्रा विनोद सरोदे यांनी सहाय्य केले. प्रा सुवर्णा म्हसेकर यांनी समन्वय केले. या कार्यक्रमाला डॅा शुभांगी जोशी, उपप्राचार्य, वाणिज्य विभाग यांनी मार्गदर्शन केले. यात १०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
स्पर्धेचे विजेते खालीलप्रमाणे
विजेते : ई प्लायर स्पर्धा
१. चैतन्य गायकवाड, रोहन चार्ले- विमेन एमपाॅवरमेंट
२. ओम पाटील, प्रथमेश देशपांडे – बिग डेटा
३. अनुष्का मेहरा- डिजिटल मार्केटिंग
व्हिडीओग्राफी
१. अंकिता गाढवे, (माॅडर्न महाविद्यालय), ओम जंजाल, गरवारे काॅलेज
२. ईंद्रजीत माने , माॅडर्न महाविद्यालय
३. दिशा शेट्टी, नियती नाईक , माॅडर्न महाविद्यालय
वेबसाईट
१. फरहिन सय्यद, माॅडर्न महाविद्यालय
२. अंकिता, नियती नाईक , माॅडर्न महाविद्यालय
३. ऋषभ सिंग ,माॅडर्न महाविद्यालय