छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ राजकीय फायद्यासाठी उपयोग : उदयनराजे

0
slider_4552

आग्रा :

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच महिन्यांपूर्वी केली होती. त्यांच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुकही केले होत. या म्युझियमच्या निर्माणासाठी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजाची आग्र्याहून सुटका या घटनेचा इतिहास शोधण्यासाठी पुरावे जमा करण्यात आले आहेत. जानेवारी २०१६ मध्ये या संग्रहालयाचे भूमिपूजन झाले असून ताजमहालच्या गेटपासून अवघ्या दिड किमी अंतरावर हे संग्रहालय उभं राहणार आहे. सुमारे २०० कोटी रूपये खर्चाच्या या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यानां औरंगजेबने आग्रा येथे कैदेत ठेवले होते. पण शिवाजी महाराजांनी यशस्वीपणे आग्राहून सुटका केली. याचा प्रेरणादायी या संग्रहालयात मांडला जाणार आहे. त्यांच्या या निर्णयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज या नात्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी राजमुद्रा भेट देवून योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.

आतापर्यंत अनेक राजकिय पक्षानी आणि नेत्यानीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला. मात्र तुमच्या सारख्या राजकिय नेत्यांनी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांच्या नावे संग्रहालय बनवून महाराजांच्या पराक्रमाचा मोठा गौरव केला आहे. अस म्हणत उदयनराजे यांनी एकीकडे योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे तर दुसरीकडे शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास संपूर्ण जगापुढे आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या घराण्याच्या वतीने तुमचे आभार मानतो. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून शिवसेनेसह अनेक राजकिय पक्षानी आपलं राजकिय अस्तित्व निर्माण केलं. त्याच शिवसेनेला महाराजांच्या किर्तीला साजेसं असं स्मारक महाराष्ट्रात उभारता आलं नाही. मात्र उत्तरप्रदेशात संग्रहालयाच्या रुपाने राष्ट्रीय स्मारक उभारल्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. अस यावेळी उदयनराजे म्हणाले आहेत.

 

See also  औषध क्षेत्रात भारताचाच डंका : नरेन्द्र मोदी