पाषाण :
कोरोना ची वाढती परिस्थिती लक्षात घेता, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वर वाडी या भागामध्ये करोना लसीकरणाची सोय नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. नागरिकांनी वारंवार केलेल्या मागणीचा विचार करून पाषाण गावा मध्ये लवकरच लसीकरण सुरू व्हावे याकरिता स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर यांनी सहाय्यक आयुक्त जयदीप पवार यांच्यासह पाषाण रुग्णालयातील तयारीची पहाणी केली.
यावेळीं आयुक्त पवार यांनी लवकरच लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत आश्वस्त केले. नागरिकांची गैरसोय थांबावी म्हणून कोरोना लसीकरण मोहीम पाषाण गावातील कै. सहदेव निम्हण कुटी रूग्णालय या ठिकाणीं कोरोना लसीकरण मोहिमेची सुरूवात लवकरच होईल. या ठिकाणी लसीकरण सुरु झाल्यावर पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
या पाहणी वेळी स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, सहाय्यक आयुक्त जयदीप पवार, डॅा.कोडलकर, डाॅ.चिटणीस, सातपुते मुकादम, चोपडे उपस्थीत होते.