पाषाण प्रतिनिधी :-
आज सकाळपासून पाषाण तलाव परिसरात एचईएमआरएल भिंतीलगत लोकांच्या निदर्शनास आलेल्या रानगवा दिवसभर रेस्क्यू ऑपरेशनद्वारे जंगलात पाठवण्याचा प्रयत्न असफल ठरला. परंतु संध्याकाळी होतात रानगवा स्वतःच्या मनाने एचईएमआरएल (उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा) जंगलाकडे निघाला पण तो त्याच्या भागात पोहोचला का नाही हे सांगणे कठीण आहे.
रानगवा संध्याकाळी आपल्या परतीच्या मार्गाला निघाला परंतु तो परत येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. त्यामुळे आसपास परिसरातील नागरिकांना धास्ती निर्माण झाली आहे. एच ई एम आर एल जवळ असणाऱ्या डोंगराळ जंगलामध्ये हा रानगवा गेला की नाही हे अंधार पडल्यामुळे लक्षात येणे अवघड होते. या डोंगरा जवळ असणाऱ्या गावा मध्ये हा रानगवा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वन अधिकारी व पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतरही रानगवा सकाळपासून ठाण मांडून होता. तो प्रयत्न करूनही भाग सोडायला तयार नाही असे दिसत होते. परंतु संध्याकाळ होताच तो परतीच्या मार्गाला निघाल्यामुळे हे दिसताना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जीवात जीव आला, त्यामुळे परतीच्या मार्गाला हा गेलेला रानगवा परत येऊ नये हीच सगळ्यांनी अपेक्षा ठेवली आहे.
मागील दोन आठवड्या पूर्वी कोथरूड येथे आलेल्या रानगव्याचे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे निदान आज आलेला हा रानगवा सुखरूप जंगलामध्ये जावा प्रयत्न चालू होते. हे प्रयत्न दिवसाखेर रानगवा परतीला निघाल्यामुळे वनाधिकारी व इतर सर्व प्रशासनातील लोकांनी दीर्घ श्वास सोडला.