बाणेर :
करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरू झाल्या आहेत. बाणेर येथील ज्ञानेश्वर मुरकुटे हायस्कूल ची मोठ्या उत्साहात शाळा सुरू झाली आहे. शाळेचे मुख्याद्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. सॅनिटायझर व मास्कचे वापर करत मुलांनी मोठया आनंदात शाळेत प्रवेश केला. खुप दिवसांनी आपले मित्र भेटले तसेच मोकळ्या वातावरणात बाहेर पडून शिकण्याचा आनंद मुलांना मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
शाळा सुरू झाल्याची माहिती देताना शाळेचे संस्थापक अशोक मुरकुटे यांनी सांगितले की, खूप मोठे कालावधीनंतर शाळेतील अंगण गजबजून गेले आहे. शाळेत मुले नसल्याने कोमेजून पडलेली शाळा फुलून गेली. शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या आरोग्याची खबरदारी घेण्याचे काम शाळेतील स्टाफ करत आहे. मुलांना प्रसन्न वातावरणामध्ये शिक्षण घेता यावे तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जावी त्याकरिता सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले.
यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे विद्यालयाचे संस्थापक अशोक मुरकुटे, माजी नगरसेविका रंजना मुरकुटे तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.