पाषाण :
महिला दिना निमित्त काही विशेष महिला गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. कोविड सारख्या हलाकिच्या परीस्थिती मध्ये आपल्या कामाशी एकनिष्ठ राहुन नागरीकांची सेवा करुन आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या अशा कोविड च्या रणरागिनी, डाॅक्टर हेमलताताई कुलकर्णी, नर्स स्वाती फलके, सफाई कामगार सारीका हिरवे, सुनिताजाधव, कविता वामन यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भारती सचिन पाषाणकर, निर्मला राजेंद्र पाषाणकर,राजेंद्र पाषाणकर सरचिटणीस भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहर, विजय सुपेकर, संतोष नंदकिशोर वेल्हाळ, आकाश पवार,मंगेश अंबरुळे उपस्थित होते.
यावेळी भारती सचिन पाषाणकर यांनी सांगितले की, प्रत्येकाच्याच जीवनात असणाऱ्या महिलांच्या योगदानाला आणि स्त्रीत्वाला साजरा करण्याच्या अनुशंगानं या दिवसाचं महत्त्वं अधिक आहे. स्त्रीशक्ती आणि त्यांच्या कर्तृत्त्वाची प्रशंसा या दिवशी आवर्जून केली जावी या उद्देशाने महिला दिवस साजरा केला आहे.