सुसगाव :
दिवाळीचा निमित्त साधून गावातील नागरिकांसाठी प्रथमच एक अनोखी संगित्मय पर्वणी पाहण्याची संधी गौरी ॲग्रो व दिशा फोरम, अनिल बाप्पू ससार आणि दिशा ससार आयोजित दिवाळी पहाट या कार्यक्रमात संगीतकार / अभिनेत्री सायली संभारे, मुरलीधर पंडित यांच्या कलेची झलक परिसरातील नागरिकांना पाहायला आणि ऐकायला मिळाली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास दाद दिली.
या कार्यक्रमाची माहिती देताना आयोजक अनिल ससार यांनी सांगितले की, अध्यात्मिक वारसा असणाऱ्या सुसगाव परिसरातील नागरिकांना दिवाळी निमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद उपभोगता यावा म्हणून खास दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास नगरसेवक अमोल बालवडकर, मुरलीधर चांदेरे, नारायण चांदेरे, दत्तात्रय बांदल, तंटामुक्ती दशरथ चांदेरे, माउली चांदेरे, सोपान चांदेरे, दशरथ ससार, प्रल्हाद चांदेरे, नंदकुमार फणसे, सुहास सोनवणे, ह भ प कृष्णाजी भोते, ह भ प बाळू चांदेरे, साहेबराव काळभोर, बाळासाहेब ससार, वसंत चांदेरे, बाळासाहेब रानवडे ,चंद्रहास पाटील, चंदेल काका, गवारकर काका, महेंद्र ससार, अनंता चांदेरे, जालिंदर फणसे, निलेश चांदेरे, समीर पारखी, अतुल आमले, रामभाऊ साबळे, सुरेश ससार, प्रभंजन फणसे, शशिकांत बालवडकर, संदीप बांदल, विजय व्यवहारे, प्रमोद निरावाने, वाळुंज साहेब, ज्ञानज्योत महिला भजनी मंडळ, भैरवनाथ भजनी मंडळ, तसेच सुस परिसरातील सोसायटी मधील नागरिक मोट्या संख्येनी उपस्थित होते.