बालेवाडी :
डॉ. सागर बालवडकर आयोजीत एस के पी रोलिंग ट्रॉफी’ टी-१० इंटर सोसायटी क्रिकेट प्रिमिअर लीगचे उदघाटन झाले. सहभागी संघांनी स्पर्धेची मानाची ज्योत घेऊन मैदानात फेरी मारल्यानंतर, नारळ वाढवून प्रशांतदादा जगताप यांनी स्पर्धेचा शुभारंभ केला.
प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर सागर पालकर यांनी सांगितले की खेळ पाहणे मधून एकजूट निर्माण होण्याकरिता व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार व्हावे या उद्देशाने या लीगचे आयोजन केले जाते. नागरिकांचा फार मोठ्या प्रमाणात या लीग मध्ये सहभाग असतो म्हणून हि लीग यशस्वी होते.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की, डॉ. सागर बालवडकर आणि प्रा. रूपाली बालवडकर यांनी आयोजीत केलेल्या लीगच्या माध्यमातुन सोसायट्या मधील नागरीक एकत्र आणण्याचे काम केले आहे. हे निर्माण झालेले नाते कायम टिकून राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सागर बालवडकर यांच्या पाठीमागे भक्कम उभा आहे. त्यासाठी हवी असणारी साथ उपस्थीत सर्व नागरिक नक्की देतील.
यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक बाबुराव चांदेरे, SKP चे अध्यक्ष गणपतराव बालवडकर, विशाल विधाते, समीर चांदेरे, रुपाली बालवडकर मनोज बालवडकर, मित वीज आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित होते.