बालेवाडी :
बालेवाडी येथील एसकेपी कॅम्पस मध्ये प्रा. रुपाली बालवडकर च्या वतीने येणाऱ्या औंध-बालेवाडी येथील पहिल्या-वहिल्या नाविन्यपूर्ण महिलांसाठीच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मा. खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.
पुरुषांच्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन आनंतर महिलांच्या साठी पहिल्यावहिल्या नाविन्यपूर्ण महिला क्रिकेट लिखे आयोजन करण्यात आले. विविध सोसायट्यांमधील सहभागी झालेल्या महिलांचा उत्साह शिखरावरती पोचलेला होता. अतिशय जल्लोषात मध्ये या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. महिला संघांनी ढोल-ताशांच्या मिरवणुकीमध्ये मशाल हाती घेत खेळामध्ये उतरण्यासाठी असणारा जल्लोष यानिमित्त दाखवून दिला.
प्रा. रूपाली बालवडकर म्हणाल्या की, वुमेन्स क्रिकेट लीगच्या निमित्ताने महिलांना दैनंदिन जीवनातील व्यापातून थोडासा दिलासा मिळून मनसोक्त खेळाचा आनंद घेता यावा या उद्दिष्टाने ही स्पर्धा आयोजित केली आणि तेवढ्याच जल्लोषात मोठ्या उत्साहात या महिलांनी आपला सहभाग दाखविला आहे. वातावरणात Community Spirit भरलेला ‘न भूतो’ असा उत्साह या स्पर्धेच्या निमित्ताने दिसला. ही स्पर्धा निश्चितच रंगतदार होईल अशी अपेक्षा यानिमित्त व्यक्त करत आहे. या स्पर्धेला यशस्वी करण्या करिता झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार.
समोर महिला खेळाडूंचा जल्लोष पाहून मलादेखील मैदानात खेळावयास उतरण्याची इच्छा निर्माण झाली असे वक्तव्य स्पर्धेच्या उद्घाटन करताना खासदार वंदना चव्हाण यांनी केले. परंतु महिलांनी अतिशय जय्यत तयारी या स्पर्धेच्या निमित्ताने केली आहे. त्यांच्या सोबत खेळण्यासाठी मला तयारी करण्यास करावे लागेल म्हणून पुढील काळात ह्या अशा चांगल्या स्पर्धेत मी सुद्धा खेळायला उतरण्यास इच्छुक असल्याचे त्या म्हणाल्या. डॉ. सागर बालवडकर आणि प्रा. रूपाली बालवडकर वतीने राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम नागरिकांना फलदायी ठरत आहे. त्यांच्या विविध कामांमुळे सोसायटीतील नागरिक त्यांना साथ देतील अशी अपेक्षा आहे.
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, एस के पी चे संस्थापक-अध्यक्ष गणपतराव बालवडकर, समीर चांदेरे, शीला भालेराव, पूनम विधाते, सरलाताई चांदेरे, प्रणव कळमकर, मनोज बालवडकर, सुषमा ताम्हणे, तानाजी चोंधे, पोपट बालवडकर, अशोक बालवडकर, मीना विधाळे, अंशुमाला सिंह, प्राची सिद्दीकी आणि आयोजक कार्यकर्ते, सोसायटी खेळाडू प्रेक्षक मोठया प्रमाणात उपस्थित होते.