बाणेर :
शिवसेना प्रभाग क्रमांक १३ बाणेर सुस महाळूंगे च्या वतीने डॉ. दिलीप मुरकुटे(पाटील) आणि ॲड. लीना मुरकुटे (पाटील) यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा बार असोसिएशनचे निवडून आलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच श्री क्षेत्र देहू नगरपंचायत नगरसेवक, नगरसेविका व सरपंच कासारआंबोली यांचा जाहीर सत्कार समारंभ बाणेर येथील राम मंदिरा मध्ये शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांच्या शुभहस्ते आणि शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
यावेळी प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना परिसरातील चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे आपले कर्तव्य असते. म्हणूनच पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल परिसरातील ॲड. पांडुरंग थोरवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करत आहे. तसेच आपल्या सभोवतालच्या परिसरात विविध पदावर निवडून आलेल्या मान्यवरांचा देखील सन्मान आपण यानिमित्त करत आहोत. असा सन्मान झाल्याने निश्चितच पुढील काळामध्ये हे सर्व सत्कारमूर्ती चांगले काम करून समाजामध्ये बदल घडवतील अशी आशा व्यक्त करत आहे.
शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, डॉ. दिलीप मुरकुटे यांनी परिसरामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचा काम नेहमीच केले आहे. विविध क्षेत्रामध्ये चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहित ते नेहमीच करत असतात. कोकणात उद्भवलेल्या पूरपरिस्थिती च्या वेळी देखील त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अकरा लाखाची मदत केली होती. शिवसेनेच्या माध्यमातून ते करत असलेले काम नेहमीच वाखाणण्याजोगे आहे. पुण्यामध्ये हायकोर्ट व्हावे यासाठी शिवसेना नेहमीच पुढाकार घेऊन मदत करत राहील. पुणे बार असोसिएशनला शिवसेनेच्या माध्यमातून सहकार्य होत राहील. शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी देखील डॉ. दिलीप मुरकुटे करत असलेले काम बांधिलकी जपणारे आहे. त्यांचे उपक्रम नेहमी समाजाला उपयोगी पडतात असे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे यांनी सांगितले, सुरुवातीच्या काळापासूनच डॉ. दिलीप मुरकुटे यांनी पाठबळ दिल्यामुळेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश संपादन करण्यास स्फूर्ती मिळाली. त्यांनी दाखविलेला विश्वास पुढील काळात देखील सार्थ ठरेल असेच काम करत राहू.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी सत्कार मूर्तींचे अभिनंदन करतानाच या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या दिलीप मुरकुटे यांचेदेखील ते राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. या भागात शिवसेनेची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने चांगले काम सर्व शिवसैनिकांनी केले असून येणाऱ्या भविष्यकाळात या भागात शिवसेनेचा नगरसेवक होण्याकरिता प्रयत्न करणारा आहे. नव्याने समाविष्ट सुस, महाळुंगे गावामध्ये तसेच बाणेर मध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या ताकतीचा पूर्ण क्षमतेने उपयोग केला जाईल असे ते म्हणाले.
या वेळी शिवसेना गटनेते नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे, ॲड लीना मुरकुटे (पाटील), माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, युवा नेते गणेश मुरकुटे, ॲड. गोरक्षनाथ काळे, उद्योजक गणपत मुरकुटे, शिवाजी बांगर, ॲड. नितीन कोकाटे, प्रवीण काळोखे, ॲड. मोनिका वाडकर, ॲड. मंदार जोशी, जिवन चाकणकर, राजाभाऊ मारणे, ॲड. दिलीप शेलार, ज्योती चांदेरे, युगंधरा मुरकुटे, संगीता पाटील, विजय विधाते, गुलाबराव तापकीर, राम गायकवाड, ॲड. श्रीकांत पाटील, ॲड. आशिष ताम्हाणे, देहू नगराध्यक्षा रसिका काळे, योगेश काळोखे, माजी सरपंच गीता गुजर, ॲड. विवेक भरगुडे, ॲड. नितिन दगडे, आणि पुणे बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष,पदाधिकारी, सदस्य, देहू नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक नगराध्यक्ष आणि सुस माळुंगे बाणेर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.