भारतीय तटरक्षक दलाची ताकद वाढवण्यासाठी तटरक्षक दलात ‘सक्षम’ नावाचं जहाज दाखल

0
slider_4552

गोवा :

भारतीय तटरक्षक दलाची ताकद वाढवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने संरक्षण खर्चात वाढ करत आहे. याच पाश्वभूमीवर आता तटरक्षक दलात ‘सक्षम’ नावाचं जहाज दाखल झालं आहे.

गोव्यातील ऑफशोअर गस्ती जहाज सेवेत हे जहाज सामील झाले आहे. 105 मीटर ऑफशोअर गस्ती जहाजांच्या मालिकेतील ‘सक्षम’ हे पाचवे जहाज आहे. गोव्यात बुधवारी संरक्षण सचिव अजय कुमार यांनी महासंचालक व्हीएस पठानिया आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे जहाज लॉन्च केले गेले. हे पाच ऑफशोर पेट्रोल व्हेसल्स च्या मालिकेतील पाचवे आहे. मेसर्स गोवा शिपयार्ड लिमिटेड द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ च्या दृष्टीकोनानुसार हे स्वदेशी बनावटीचे आहे.

दरम्यान, जहाज अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन उपकरणे, सेन्सर्स आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज आहे. हे 105 चौरस मीटर (344 फूट 6 इंच) लांब आणि सुमारे 2400 टन वजनाचे आहे. त्याचबरोबर इंटिग्रेटेड ब्रिज सिस्टीम, पॉवर मॅनेजमेंट सिस्टीम, इंटिग्रेटेड मशिनरी कंट्रोल सिस्टीम आणि हाय पॉवर एक्सटर्नल फायर फायटिंग सिस्टीमने सुसज्ज आहे. हे भारतीय तटरक्षक जहाज शोध, बचाव आणि सागरी गस्तीसाठी तयार करण्यात आले आहे. तसेच ‘सक्षम’ डबल इंजिन लाइट हेलिकॉप्टर आणि पाच हायस्पीड बोटी आहेत.

See also  कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्राची मोठी घोषणा!