औंध :
औंध येथील कस्तुरबा गांधी वसाहत, गणेशखिंड रोड, येथील कै.खंडेराव बाळा जुनवणे मनपा शाळा क्र. ११२ मुलांची “शाळा पूर्व तयारी मेळाव्यास” सुखाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश कांबळे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची माहिती देताना सुखाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी सांगितले की, “शाळा पूर्व तयारी मेळाव्यास”लहान छोटे विद्यार्थ्यांसोबत काही वेळ घालवता आला. या मुलांचा शाळेत येण्यासाठी चा आनंद त्यांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता. या निमित्ताने शाळेचे निरिक्षण करून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. महानगरपालिकेच्या शाळांची एकंदरीत परिस्थिती ही फारशी बरी नाही. शाळेत सुधारणा होणे आवश्यक आहे. ही परिस्थिती बदलावी म्हणून महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जिवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी लवकरच युवाशक्ती औंधरोड व सुखाई प्रतिष्ठान मार्फत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवणारी योजना घेऊन येणार आहोत.
यावेळी मुख्याध्यापिका कल्पना चव्हाण, उपशिक्षक राजेंद्र दिवटे, शिक्षण सेवक जयश्री भिंताडे, बालवाडी शिक्षिका पौर्णिमा कोकाटे, गुरुप्रसाद चाकणकर, संजय सोनवणे,शंकर सुपे, ज्ञानेश्वर गायकवाड व पालक मेळाव्याला उपस्थित होते.