पुणे :
पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने शिवसेना कसबा मतदार संघ व पुना अँमेच्युअर्स कबड्डी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 48 वी कुमार कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये कुमार गटात चेतक स्पोर्ट्स क्लब बालेवाडी आणि अभिजीत दादा कदम प्रतिष्ठान यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. अतिशय चुरशीने खेळला गेलेला हा सामना निर्धारित वेळेमध्ये बरोबरीत संपला. त्या नंतर झालेल्या पाच पाच चढाया मध्ये चेतक स्पोर्ट्स क्लब बालेवाडी संघाचा अवघ्या एका गुणाने पराभव करीत अभिजीत दादा कदम प्रतिष्ठान संघ विजयी झाला.
कुमार गट अंतिम सामन्यात 8 गुणांची मोठी आघाडी असून देखील अंतीम क्षणी ती टिकवता न आल्याने चेतक स्पोर्ट्स क्लब बालेवाडी संघाचा पराभव झाला. पराभूत संघाकडून राहूल वाघमारे, ओंकार काळभोर, तर विजयी संघाकडून आदित्य शेळके, कुणाल पवार, दिपक शर्मा या खेळाडूंनी चांगला खेळ केला. अंतिम सामन्यात सामनाधिकारी म्हणून सरपंच दिलीप शिळीमकर, पंच महादेव माने, पंच दत्ता हेगडकर व गुणलेखक म्हणून अतुल जगताप यांनी काम पाहिले.
तत्पूर्वी झालेल्या कुमारी गटातील अंतिम सामन्यात कला क्रीडा विकास प्रकल्प संघाने द्रोणा स्पोर्टस क्लब चा 4 गुणांनी पराभव करत कुमारी गट अजिंक्यपद मिळविले. कला क्रीडा विकास प्रकल्प संघा कडून मनीषा राठोड, भूमिका गोरे, शिखा वस्ताद यांनी तर द्रोणा स्पोर्ट्स कडून श्रुतिका व्यवहारे, आंचल पवार, साक्षी गदादे यांनी सुरेख खेळ केला. कुमारी गट अंतिम सामन्यात सामनाधिकारी म्हणून सरपंच शेखर रावडे, पंच पियूष हणमंते, पंच दिलीप शिळीमकर तर गुणलेखक म्हणून विजय पवार यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत कुमारी गट निवड समिती : १) धनश्री जोशी २) ऋषिकेश मद्रासी ३) सुजाता समगिर
कुमार गट निवड समिती : १) सुर्यकांत मुटके २) संभाजी काळे ३) जगताप
या स्पर्धेत पंच प्रमूख म्हणून आंतरराष्ट्रीय पंच दत्ता झिंझुर्डे यांनी काम पाहिले तर सहायक पंच भरत शिळीमकर यांनी काम पाहिले.
बक्षीस समारंभ प्रमुख पाहुणे म्हणून मुळशी पॅटर्न फेम सिने अभिनेता रमेश परदेशी, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, अर्जुनवीर शांताराम जाधव, अर्जुनवीर शकुंतला खटावकर, कार्याध्यक्षा वासंती सातव बोर्डे, उपकार्याध्यक्ष राजेन्द्र अण्णा देशमुख, लहू बालवडकर, सह कार्यवाह राजेन्द्र आंदेकर, योगेश यादव, संदिप पायगुडे, दत्तात्रय कळमकर, अनिल यादव, आयोजक उमेश गालिंदे अखिल नविपेठ शिवसेना शाखा, पूना अम्यूचेअर्स संघ, रणमर्द मंडळ कार्यकर्ते, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन पाधाधिकारी पंच खेळाडू प्रेक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.