पुणे महापालिकेकडून पुणेकरांना मोठा दिलासा कोणतीही कर वाढ नाही

0
slider_4552

पुणे :

महापालिकेकडून पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील आर्थिक वर्षात कुठलीही करवाढ न करण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.

मिळकत आणि करमणूक कर अशा दोनही करांमध्ये कुठल्याही प्रकारची करवाढ करण्यात येणार नाहीये. महापालिकेच्या या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या नियमानुसार एका ठराविक कालावधीनंतर मिळकत करामध्ये वाढ करण्यात येते. मात्र पुढील आर्थिक वर्षामध्ये मिळकत करामध्ये कुठलीही करवाढ करण्यात येणार नसल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. नागरीकांकडून गेल्या वर्षी जेवढा मिळकत कर आकारण्यात येत होता. तेवढाच कर आता पुढील आर्थिक वर्षात आकारण्यात येणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक ताण पडणार नाही. कोरोना काळात हा नागरिकांसाठी मोठा दिलासा मानण्यात येत आहे.

हेमंत रासणे यांची माहिती

याबाबत माहिती देताना स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासणे यांनी सांगितले की, पुढील आर्थिक वर्षात मिळकत कर आणि मनोरंजन कर यामध्ये कुठल्याही प्रकारची करवाढ न करण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. नागरिकांकडून पूर्वी जेवढा होता, तेवढ्याच कराची वसुली करण्यात येणार आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेले दर पुढील आर्थिक वर्षासाठी देखील कायम राहणार आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय?

दरम्यान सध्या पुणे महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला जात असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयाचा फायदा सत्ताधारी पक्षाला होऊ शकतो. मात्र यापेक्षा महत्त्वाचे म्हणेज गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाची लाट आहे. पुण्यात तर कोरोनाची परिस्थिती भीषण बनली होती. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे ठप्प होते. आता हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. मात्र तरी देखील नागरिक अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाहीत. अशा स्थितीत करामध्ये वाढ न करण्याचा निर्णय हा नागरिकांच्या पथ्यावर पडणारा आहे.

See also  पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी आवश्यक प्रभाग रचना लांबणीवर पडण्याची शक्यता ?