देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राजकीय वाटचाल…

0
slider_4552

नवी दिल्ली :

देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशाला आदिवासी समुदायातील पहिल्या राष्ट्रपती लाभल्या आहेत.

द्रौपदी मुर्मू या भाजप एनडीएच्या उमेदवार म्हणून राष्ट्रपतिपदासाठी निवडून आल्या आहेत. द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत तसंच त्या ओडिसातील पहिल्या महिला आदिवासी नेत्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित 21 जून रोजी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना उमदेवारी मिळाली. या निवडणुकीसाठी विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली होती.

वैयक्तिक आयुष्यात चढाओढ…
गावात प्रवेश केल्यानंतर अडीच किलोमीटर अंतरावर एक शाळा आहे. याळेचे नाव आहे श्याम, लक्ष्मण, शिपुन उच्च प्राथमिक निवासी विद्यालय. कधी काळी या ठिकाणी एक घर होते. याच घरात 42 वर्षांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नववधू म्हणून प्रवेश केला होता. विवाहोत्तर काळात 2010 ते 2014 या चार वर्षांत त्यांना तीन संकटांचा सामना कारावा लागला. याच चार वर्षांत त्यांच्या दोन तरुण मुलांचा आणि पतीचा मृत्यू झाला. मोठा मुलगा लक्ष्मण याचा मृत्यू 2010 साली गूढरित्या झाला. आजही त्याच्या मृत्यूचे गूढ उलगडलेले नाही. तो त्याच्या मित्रांकडे पार्टी करण्यासाठी गेला होता. रात्री घरी परतला. सांगितलं की मी थकलो आहे, मला डिस्टर्ब करु नका. सकाळी दरवाजा लाजवला तर उघडला गेला नाही. दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर 25 वर्षीय मुलाचा मृतदेहच सापडला. हे दुख पचवत नाहीच तोच दुसरा मुलगा शिुपन 2013 साली रस्त्यावरील गाडीच्या अपघातात मारला गेला. त्याचे वय तेव्हा 28 होते. दोन मुलांच्या आणि पतीच्या मृत्यूनंतर या घराची जागा द्रौपदी मुर्मु यांनी निवासी वसतीगृहाला देऊन टाकली.

कोण आहेत द्रौपदी मुर्मू?, वाचा त्यांची राजकीय वाटचाल…
द्रौपर्दीमुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 साली मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी या गावात झाला. मुर्मू या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहे. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2000 आणि 2009 मध्ये भाजपच्या तिकिटावर त्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार झाल्या. त्यापुर्वी 1997 मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या. आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम सांभाळले आहे.

See also  भारती एअरटेल ची भारतात 5 जी रेडी नेटवर्कची घोषणा.

ओडिसातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक राज्यमंत्री आणि 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 या कालावधीत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या. 2015 मध्ये मुर्मू या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल झाल्या. नगरसेविका, आमदार, राज्य सरकारमधील मंत्री आणि राज्यपाल अशा अनेक राजकीय पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांना 2007 मध्ये ओडिशा विधानसभेने ‘सर्वोत्कृष्ट आमदार’ म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित देखील केले आहे. आता राष्ट्रपती म्हणून देशाचा कार्यभार सांभाळणार आहेत.