बालेवाडी येथील एस के पी कॅम्पस मधील सीएम इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के..

0
slider_4552

बालेवाडी :

बालेवाडी येथील एस के पी कॅम्पस मधील सीएम इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. परिसरातील नामांकित असणाऱ्या या स्कूलमध्ये दर्जेदार शिक्षण शिकविले जाते. याची प्रचिती सीबीएसई दहावीच्या परीक्षे त लागलेल्या निकालावरून लक्षात येते.

सीएम इंटरनॅशनल स्कूलच्या निकालाची माहिती देताना डॉक्टर सागर बालवडकर म्हणाले, सीएम इंटरनॅशनल स्कूलचे दहावीचे सर्व विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के निकालासह उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी, व्यवस्थापन, शिक्षक आणि पालकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. सर्वांनी घेतलेल्या कठोर परिश्रमाचे हे फळ असून दहावीची पहिली तुकडी फ्लाइंग कलर्ससह यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली आहे. परिसरातील नागरिकांच्या पाल्यांसाठी आम्ही दर्जेदार शिक्षण पुरविण्यात यश संपादन करत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शाळेसाठी अधिक उल्लेखनीय कामगिरीची ही फक्त सुरुवात आहे. याही पेक्षा उंच भरारी घेण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू.

एसकेपी कॅम्पसचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव म्हातुजी बालवडकर, सचिव एसकेपी कॅम्पस डॉ.सागर बालवडकर, संचालक सीएम इंटरनॅशनल स्कूल, प्राचार्य सीएम इंटरनॅशनल स्कूल, कु. इक्बाल कौर राणा यांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.

सीएम इंटरनॅशनल स्कूल
सीबीएसई दहावीचा निकाल
शैक्षणिक वर्ष 2021-22

100 टक्के निकाल

टॉपर्स
प्रथम – अन्वेषा वर्तक – 97.2 टक्के

द्वितीय – शरयू कोतकर – 97 टक्के

तृतीय – माही गोयल – 96 टक्के

 

See also  हॉटेल चालकानी रस्त्यामध्ये केलेल्या कार्यक्रमा विरोधात नागरिकांचे आंदोलन. पोलिसांनी दाखल केला गुन्हा...!