गणेशोत्सवात सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षेविषयी भर देणे गरजेचे : खासदार गिरीश बापट

0
slider_4552

पुणे :

कोविडनंतरचा हा गणेशोत्सव असल्याने सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षेविषयी भर देणे गरजेचे आहे. गणेशोत्सव मंडळांनी महानगरपालिकेशी संपर्क करुन तात्पुरत्या स्वच्छतागृहांची सोय करायला हवी. महानगरपालिकेसोबतच पोलिसांनी देखील तात्पुरत्या स्वच्छतागृहांची सोय करावी. पोलिसांकडे नागरिकांकडून मिळालेल्या दंडाची रक्कम मोठया प्रमाणात जमा झाली आहे.

उत्सवाकरिता त्याच पुणेकरांच्या पैशातून ५ ते १० कोटी रुपये स्वच्छतेच्या सोयींवर पोलिसांनी खर्च करावे, असे आवाहन खासदार गिरीष बापट यांनी केले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या १६२ मंडळांपैकी ११२ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १५ लाख ९ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात आली. स्पर्धेच्या परीक्षण मंडळात पराग ठाकूर, डॉ.अ.ल.देशमुख, विजय चव्हाण, कै. अनिल घाणेकर, मधुकर जिनगरे, बापू पोतदार, सुधीर दारव्हेकर, जयश्री बोकील यांसह सहाय्यक म्हणून बाळकृष्ण घाटे, लिंगराज पाटील, शुभम साळुंके, सौरभ साळेकर, दीप राणे यांनी काम पाहिले. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

See also  आंबिल ओढा सीमा भिंतीचे काम कधी पुर्ण होणार ?