बाणेर :
ग्राहकाभिमुख अत्याधुनिक सेवा सुविधा देणाऱ्या बाणेर नागरी सहकारी पतसंस्था बाणेर च्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘भैरवनाथ पुरस्कार’ गुरुवार दिनांक रोजी कुंदन गार्डन मंगल कार्यालय बाणेर येथे आयोजित केला आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, समाजाच्या सेवेतून ग्राहकांना हवे असणाऱ्या सेवा सुविधा पुरवीत यशस्वीरित्या २४ वा वर्धापन दिन साजरा करत असतानाच पतसंस्थेच्या वतीने भैरवनाथ पुरस्कार आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास परिसरातील मान्यवर, संचालक, सभासद, ठेवीदार, खातेदार, ग्राहक व हितचिंतक यांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आग्रहाची विनंती डॉक्टर मुरकुटे यांनी केली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, प्रमुख अतिथी पुणे जिल्हा बार असोसिएशन चे अध्यक्ष पांडुरंग थोरवे असणार आहे. तर भैरवनाथ पुरस्काराचे वितरण ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर आणि ममता सिंधुताई सपकाळ यांच्या शुभहस्ते वितरण करणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सर्व संचालक मंडळ पदाधिकारी यांनी केले आहे.