पुण्यातील एकनाथ शिंदे यांच्या डुबलीकेट वर गुन्हा दाखल

0
slider_4552

पुणे :

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. या बंडाळीनंतर मुख्यमंत्री झालेले शिंदे अचानक प्रसिध्दीच्या झोतात आले. अशात पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखं दिसणारा एक तरुण सध्या चर्चेत आला.

मात्र, आता मुख्यमंत्र्यांसारख दिसण हेच त्याला अडचणीच ठरलं आहे. त्याला कारण म्हणजे त्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

भाजप युवा मोर्चाचे पुण्यातील पदाधिकारी विजयराजे माने यांनी हूबेहूब मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या सारखे दिसतात. त्यामुळे त्यांना पुण्यातले एकनाथ शिंदे किंवा प्रती एकनाथ शिंदेदेखील म्हटलं जात आहे. विजयराजे माने यांनी एकनाथ शिंदेंचा वेश धारण केल्यापासून त्यांच्याकडे अनेक लोक वेगवेगळ्या मागण्या घेऊन येत आहेत. त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करत आहेत. समस्या मांडताना दिसत आहेत. त्यासोबतच अनेक मंडळींनी त्यांच्यासोबत सेल्फिसुद्धा काढून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. विजयराज माने यांना गणेशोत्सव काळात अनेक सुपऱ्या मिळाल्याच्याही चर्चा होत्या. अनेक गणेश मंडळे त्याला आरतीसाठी निमंत्रण देत होती. काही दिवसांतच स्टार झालेल्या माने यांनी मुख्यमंत्रींची भेट घेतली होती.

विजयराज माने यांचा सराईत गुन्हेगार शरद मोहोळसोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच विजय माने यांनीही अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वेषात डान्स केला. याच मुळे आता विजयराज माने यांच्याविरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी विजय नंदकुमार माने याच्याविरुद्ध भादंवि ४१९-५११, ४६९, ५००, ५०१, ​​माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

See also  एक कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवण्यास महापालिका आयुक्तांची मान्यता.