सुसगावामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गामाता महादौड मोठया उत्साहात संपन्न..

0
slider_4552

सुसगाव :

सुसगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्त अखिल सुसगाव शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या पुढाकाराने सुस गावात प्रथमच दुर्गामाता महादौड रविवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. अतिशय उत्साहात आणि आनंदात ही दुर्गामाता महादौड संपन्न झाली.

पांढरा शर्ट पांढरा कुर्ता डोक्यावरती केसरी टोपी आणि महिलांनी केसरी साडी परिधान करून या दुर्गा माता महादौड मध्ये सहभाग घेतला. लहान थोरांपासून सर्वच जण मोठया उत्साहात या दुर्गामाता महा दौड मध्ये सहभाग घेतला.

दुर्गामाता महादौड 🚩

🚩एक दौड धर्म रक्षणासाठी …
🚩एक दौड असंख्य मावळ्यांच्या बलिदानासाठी ….
🚩एक दौड रायगडाच्या वैभवासाठी…
🚩एक दौड ज्वलंत धर्मरक्षणासाठी

सुसगावाने सांस्कृतिक, नैसर्गिक, संप्रदायिक, क्रीडा आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. गावात नेहमीच विविध सांस्कृतिक, सांप्रदायिक आणि क्रिडा क्षेत्रात विविध कार्यक्रम सर्व नागरिक मिळून एकत्रितरित्या साजरे केले आहेत व करत आहे. या दुर्गामाता महादौडला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला व भविष्यात देखील जनजागृती करत अशीच दुर्गामाता महादौड सुरू ठेवण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला.

See also  डॉ. सागर बालवडकर यांच्या प्रयत्नातून बालेवाडी येथे लसीकरण केंद्र सुरू !