सोमेश्वरवाडी :
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे नुकतेच 26 ऑक्टोंबर रोजी हृदयविकाराने आकस्मित निधन झाले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्या करिता शनिवार दिनांक 5/11/2022 रोजी सायंकाळी 5:00 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे.
झुंजार कर्तृत्व व आदर्श व्यक्तिमत्व असलेले कै. मा. आमदार विनायक निम्हण राजकारण आणि सामाजिक जीवनात कणखर, आदर्श व वैचारिक वारसा असलेले व्यक्तिमत्व, ते प्रेमळ, मनमिळावू व सर्वसमावेशक स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते.
अवघ्या महाराष्ट्रात आपल्या मनमिळावू स्वभावा मुळे ते प्रसिद्ध होते. या श्रद्धांजली सभेला राजकिय, सामाजिक, क्रीडा, सांप्रदायिक, सांस्कृतिक, क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते उपस्थित राहून श्रध्दांजली वाहतील.
स्वर्गीय विनायक निम्हण यांचा राजकीय प्रवास :
विनायक निम्हण हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. दोन वेळा ते कोथरूड मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. तर कोथरूड मतदार संघाचे विभाजन झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्यांनी शिवाजीनगर मतदारसंघात देखील आमदारकी भूषविली होती.
शशिकांत सुतार यांच्यानंतर विनायक निम्हण कोथरूड मतदारसंघांमध्ये शिवसेने तर्फे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. कोथरूड मतदार संघामध्ये निम्हण यांनी त्याच ताकतीने शिवसेना वाढवली. विनायक निम्हण हे राजकारणामधील एक बडे प्रस्थ होते. सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देऊन मोठे करण्याची त्यांची खुबी होती. विनायक निमहण यांनी सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात करून आमदार की पर्यंत पोहोचले होते.
विनायक निम्हण हे शिवाजीनगर मतदारसंघातून दोन वेळेस (१९९९ ते २००९) शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. नंतर त्यानी नारायण राणे यांच्या बरोबर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर मतदार संघामध्ये (२००९ ते १०१४) काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते.
राजकारणासोबतच उद्योग व्यवसायात देखील मा. आमदार विनायक निम्हण यांचे मोठे नाव होते पुण्यातील प्रसिद्ध ‘सनीस वर्ड’ त्यांनी यशस्वी रित्या उभे केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक युवकांनी उद्योग व्यवसायामध्ये यश संपादन केले.