दिन दलितांच्या उद्धारासाठी शिक्षण हे एकमेव शस्त्र : छगन भुजबळ

0
slider_4552

पुणे :

दिन दलितांच्या उद्धारासाठी शिक्षण हे एकमेव असे शस्त्र आहे असे सांगत बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भावराव पाटील, महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्यासह ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांची पूजा करा असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने समता भूमी फुले वाडा पुणे येथे आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते कवी प्रा.डॉ.यशवंत मनोहर यांचा ‘समता पुरस्कारा’ने तर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचा ‘सत्यशोधक पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, प्रा.हरी नरके, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, जयदेव गायकवाड, पांडुरंग अभंग, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरीताई धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रा.दिवाकर गमे, तुकाराम बिडकर, अंबादास गारुडकर, पार्वतीबाई शिरसाट, अनिता देवतकर, प्रदेश चिटणीस समाधान जेजूरकर, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, डॉ.शेफाली भुजबळ, वैष्णवी सातव, मनीषा लडकत यांच्यासह राज्यभरातील समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा प्रश्न असेल तसेच पुणे विद्यापीठास सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा यासाठी खा. शरदचंद्र पवार साहेब यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. अद्यापही फुलेवाडा विस्तारीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. तेथील रहिवाश्यांच्या स्थलांतराचा प्रश्न अद्याप बाकी आहे. तसेच भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या महिला शाळेच्या ठिकाणी ‘सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा’ सुरू करून त्या रूपाने राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झालेली आहे. याबाबत लवकरच सर्वांना एकत्रित आणून बैठक घेऊन निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल. अन्यथा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी १ जानेवारी पर्यन्त हा प्रश्न मार्गी लागला नाही तर सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात आपण सहकुटुंब सहभागी होऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.

See also  संतश्रेष्ठ तुकाराम महाराजा व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे पुण्यात आगमन