पुणे :
पुणे महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत बांधकामावर होणारी कारवाई केवळ ठराविक गावांना वेटीस धरून केली जाते. म्हणून रिपब्लिकन बांधकाम कामगार सेना या संघटनेने पुणे महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन धरणे आंदोलन केले.
या आंदोलनाची माहिती देताना बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर शिरसाठ यांनी सांगितले की, शहरातील अनधिकृत बांधकाम, टॉवर, होर्डिंग्ज, नाल्यावरील बांधकामे, अमेनिटी स्पेस वरील अतिक्रमणे, रिझर्वेशन जागेवरील अतिक्रमित बांधकामे इत्यादी वरती कारवाई होत नाही. तर केवळ ठराविक गावांना वेटिस धरूनच गोरगरिबांच्या बांधकामावर कारवाई केली जाते. असे न करता संपूर्ण पुणे शहरात जिथे तिथे अनधिकृत बांधकाम आढळते त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आणि आजच्या आंदोलनामार्फत आणि आयुक्तांना निवेदन देऊन केली.
आयुक्तांनी सरसकट कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने सदरचे आंदोलन आम्हीं स्थगित करत असून दिलेले आश्वासन न पाळल्यास जोरदार आंदोलन करण्याचा इशारा यावेळी अध्यक्ष सुधाकर शिरसाठ यांनी सांगितले.
यावेळी आंदोलनात रिपब्लिकन बांधकाम कामगार सेनेचे कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.