सुसगाव :
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सुसगाव येथे ‘एक गाव एक शिवजयंती’ अखिल सुसगाव शिवजयंती महोत्सव तर्फे साजरी करण्यात आली. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी संपूर्ण गावातील लहान थोर व्यक्तीने महिलांनी यामध्ये विशेष सहभाग घेऊन शिवजयंती साजरी केली.
सकाळी शिवज्योत आणून तरुण वर्गाने शिवजयंतीस सुरुवात केली. आदल्या दिवशी शिव जयंती निमित्त श्री भोंडवे महाराज यांचे शिव व्याख्यान आयोजित केले होते. सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशाच्या पथकाच्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात मोठ्या जल्लोषात ही मिरवणूक काढण्यात आली. सर्व ग्रामस्थ महिला आणि लहान थोरांच्या उपस्थितीत शिव आरती ब्रिगेडियर कर्नल माधव सायनाकर यांच्या हस्ते करण्यात आली.
*पहा सुसगाव ग्रामस्थांच्या वतीने अखिल सुसगाव शिवजयंती महोत्सव समितीतर्फे कशी साजरी झाली शिवजयंती*
_Pls subscribe_ our link
विशेष म्हणजे यावेळी जुन्या ऐतिहासिक शास्त्रांचे शस्त्र प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते. या प्रदर्शनास लहान मुलांनी तसेच ग्रामस्थांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.