पाषाण, बाणेर-बालेवाडी आणि औंध भागात हिंदू नववर्ष निमित्ताने भव्य शोभायात्रा, महिलांचा विशेष सहभाग..

0
slider_4552

पाषाण :

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने पाषाण, बाणेर-बालेवाडी आणि औंध भागात नागरिकांनी आज संध्याकाळी ५ वाजता शोभायात्रा काढण्यात आल्या. परिसरातील सांप्रदायिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे शोभ यात्रेमध्ये सहभाग घेतला. महिला, पुरूष आणि बालगोपाळांचा विशेष सहभाग होता.

पेठ जिजापूर पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी गुढी पाडवा व हिंदु नववर्षाच्या निमित्ताने सकल हिंदु समाजाच्या वतीने भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सहभागी होऊन सर्वांना हिंदु नववर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

*पहा पाषाण, बाणेर-बालेवाडी आणि औंध भागात हिंदू नववर्ष निमित्ताने भव्य शोभायात्रा..*

बाणेर बालेवाडी भागात शोभायात्रा बालेवाडी गावातील विठ्ठल मंदिरापासून निघून बाणेर गावातील भैरवनाथ मंदिरात संपली. पुढे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिववंदना करण्यात आली. शोभायात्रेच्या मार्गावर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली.

औंध येथे देखील मोठया उत्साहात शोभ यात्रा काढण्यात आली. नागरीक, महिला, लहान थोर सर्वांनी सहभाग घेतला. ढोल ताशांच्या निनाद बँडबाझा, उंट,घोडे, बैलगाडी, फुलांची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

See also  न्यायमुर्ती पी. बी. सावंत यांचे बाणेर मध्ये वृद्धपकाळाने निधन.