पुणे :
पुण्याचे भाजपा खासदार गिरीश बापट यांचे दुर्धर आजाराने निधन झाले आहे. त्यांना बुधवारी पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.







हॉस्पिटल मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७३ वर्षांचे होेते. टेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या जाण्याने पुण्यातील भाजपा मध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल
गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. परंतु त्यांच्यांवर घरीच उपचार सुरु होते. बुधवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यांवर डॉक्टरांनी उपचार सुरु केले होते. पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.







