क्रांती ज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज – आंतर जिल्हा युवा लीग कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी वेगवान चढायांचा खेळ

0
slider_4552

खराडी :

क्रांती ज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज – आंतर जिल्हा युवा लीग कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तेजस पाटील, आकाश रूडले, शिवम पटारे, प्रफुल झावरे, प्रशांत जाधव यांच्या वेगवान चढायांचा खेळ कबड्डीप्रेमींना पाहायला मिळाला.

पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यांत पुणे पलानी टास्कर्स, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स, अहमदनगर पेरियार पँथर्स व रायगड मराठा मार्वेल्स संघांनी प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करत विजयी सलामी दिली.

पुणे पलानी टास्कर्स विरुद्ध कोल्हापूर ताडोबा टायगर्स यांच्या झालेला सलामीचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. शेवटच्या चढाईत गुण मिळवत पुणे संघाने ३०-२९ असा विजयी सलामी दिली. भूषण तपकीरच्या कबड्डी का कमाल खेळाने सामन्यांत रंगत आणली. सामन्यांत कोल्हापूरचा तेजस पाटील बेस्ट रेडर ठरला.

पालघर काझीरंगा रहिनोस संघाने १७-१४ अशी मध्यंतरापर्यत आघाडी घेतली असताना अहमदनगर पेरियार पँथर्स संघाने दुसऱ्या डावात जोरदार मुसंडी मारत सामना फिरवला. ३९-३१ असा विजय अहमदनगर संघाने मिळवला. त्यात शिवम पटारे व प्रफुल झावरे यांनी सुपर टेन करत तर अभिषेक पवारने हाय फाय करत विजयात मोलाची भूमिका बजावली. पालघर कडून राहुल सवर ने एकाकी झुंज दिली.

मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स विरुद्ध लातूर विजयनगारा विर्स यांच्यात झालेल्या सामन्यांत आकाश रूडले, भारत खाटगुटकर, अलंकार पाटील जोरदार खेळ करत मुंबई उपनगर संघाला ७०-२१ असा विजय मिळवून दिला. तर शेवटच्या झालेल्या सामन्यांत रायगड मराठा मार्वेल्सने सांगली सिंध सोनिक्स संघाचा ४७- १९ असा पराभव केला. रायगड संघाकडून प्रशांत जाधव, सनी भगत व अजय मोरे यांनी चांगला खेळ केला.

दिवस १ : संक्षिप्त निकाल
१. पुणे पलानी टास्कर्स ३० विरुद्ध कोल्हापूर ताडोबा टायगर्स २९
२. मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स ७० विरुद्ध लातूर विजयनगारा विर्स २१
३. पालघर काझीरंगा रहिनोस ३१ विरुद्ध अहमदनगर पेरियार पँथर्स ३९
४. रायगड मराठा मार्वेल्स ४७ विरुद्ध सांगली सिंध सोनिक्स १९

See also  महिला ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं..