अमेरिका :
अमेरिकेतून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. अमेरिकेच्या केंटुकी येथे प्रशिक्षणादरम्यान अमेरिकेच्या सैनिकांचे २ हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे.




या दुर्दैवी घटनेत ९ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे.
अमेरिकेत सैन्यदलाचं २ हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना बुधवारी रात्री रात्री १० वाजण्याच्या (0300 GMT) सुमारास घडली आहे. सैन्यदलाचे प्रवक्ते यांनी माहिती दिली आहे की, दोन्ही हेलिकॉप्टर हे १०१ हवाई (एयरबॉर्न) विभागाचे होते. या विभागाचे प्रवक्ते अँथनी होफलर यांनी ९ सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
फोर्ट कँपबेल येथील उत्तर-पश्चिमच्या केंटुकीच्या ट्रिग काउंटी येथे क्रू मेंबर एका प्रशिक्षणादरम्यान ‘HH60 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर’ उडवत होते.याचदरम्यान, दुर्दैवी घटना घडली. या घटनेबद्दल अधिक माहिती घेतली जात आहे.
केंटुकीचे राज्यपाल अँडी बेशियार यांनी ट्विट केले की, ‘काल रात्री घडलेली घटना दु:खद आहे. या दुर्दैवी घटनेनंतर ९ मृत सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांसाठी फोर्ट कँपबेलला निघालो आहे’.
अँडी बेशियार यांनी आधीच्या ट्विटमध्ये म्हटले की, केंटुकी पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. कृपया करून आपण सर्वांनी दुर्घटनेतील सैनिकांसाठी प्रार्थना करा’. दरम्यान, अमेरिकीतील या दुर्दैवी घटनेनंतर अमिरेकीतील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.








