दोन हजार रुपयांच्या नोटा चलानातून बाद होणार, छपाई बंद…

0
slider_4552

नवी दिल्ली :

दोन हजार रुपयांच्या नोटा चलानातून बाद होण्याची शक्यता आहे. कारण 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश RBI अर्थात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दिले आहेत.

30 सप्टेंबरपर्यंतच 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात असणार आहेत. बाजारातील सध्याच्या नोटा वैध असणार आहेत असे देखील रिझर्व्ह बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत बँकांमध्ये नोटा बदली करता येणार आहेत. एकावेळी जास्तीत जास्त 20 हजार रुपयांच्या नोटा बदली करता येणार आहेत.कुठलीही गोंधळाची किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी चार महिन्यांचा कालावधी नोटा बदलीसाठी देण्यात आलेला असल्याचं RBI ने स्पष्ट केलं.

See also  अमेरिकेत जो बायडेन पर्वाला सुरुवात...