अमेरिकेत जो बायडेन पर्वाला सुरुवात… 

0
slider_4552

 

वॉशिंग्टनः

अमेरिकेसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जो बायडेन यांनी आज अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलीय. म्हणजेच आज अमेरिकेत बायडेन पर्वाला सुरुवात झालीय.

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीसुद्धा जो बायडन यांच्यासह उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतलीय. शपथविधी सोहळा कॅपिटल हिलमध्ये करण्यात आला होता. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा या समारंभास उपस्थित होते. समारंभाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, हा सोहळा अमेरिकेत आयोजित करण्यात आलाय. अमेरिकेच्या राजधानीतील व्हाईट हाऊसमध्ये सुमारे 35 हजार राष्ट्रीय गार्ड तैनात करण्यात आले होते.

चार वर्षे आश्चर्यकारक होतीः डोनाल्ड ट्रम्प

विशेष म्हणजे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा सर्वांना निरोप दिलाय. ट्रम्प यांनी निरोप देऊन सर्व सहकार्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, ही चार वर्षे आश्चर्यकारक होती. मला बरेच काही करता आले. आपणा सर्वांवर माझे प्रेम आहे, असं अमेरिकेतील लोकांना उद्देशून ट्रम्प म्हणाले. मी आपले राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले हे माझे सौभाग्य आहे. अलविदा, लवकरच आपण परत भेटू!

See also  अयोध्येतील प्रभू रामचंद्रांचं मंदिर 2023 मध्ये भक्ताांसाठी सुरू होणार