धोनीच्या चेन्नई चे पाचवे विजेतेपद, गुजरात टायटन्सला 5 विकेट्सने केले पराभूत

0
slider_4552

गुजरात :

इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्सने जिंकले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्याच चेन्नईने गुजरात टायटन्सला 5 विकेट्सने पराभूत केले.

शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना रवींद्र जडेजाने चौकार मारून चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवून दिला आहे.

गुजरातने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 214 धावा केल्या होत्या. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी आधी 215 धावांचं आव्हान मिळालं होतं.

मात्र चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात झाल्याच्या 3 बॉलनंतर पावसाची एन्ट्री झाली. पावसामुळे काही तास वाया गेले. त्यामुळे चेन्नईला डकवर्थ लुईस नियमानुसार 15 ओव्हर्समध्ये विजयासाठी 171 धावांच सुधारित आव्हान मिळालं. हे आव्हान चेन्नईने 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

चेन्नई पाचव्यांदा चॅम्पियन

दरम्यान चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पाचवी वेळ ठरलीय. चेन्नईने पहिल्यांदा 2010 साली मुंबई इंडियन्सला पराभूत करत आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून चेन्नईने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 अशा एकूण 5 वेळा हा कारनामा केलाय. चेन्नईने यासह मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मुंबईनेही 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

धोनीची निवृत्तीबाबत प्रतिक्रिया

‘माझी निवृत्ती जाहीर करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. मला जेवढे प्रेम मिळाले आहे, इथून निघून जाणं ही सोपी गोष्ट आहे, पण त्याहून कठीण गोष्ट म्हणजे 9 महिने मेहनत करून पुन्हा आयपीएल खेळण्याचा प्रयत्न करणं. हे माझ्याकडून एक भेट असेल, शरीरासाठी ते सोपं होणार नाही’ अशी धोनीने प्रतिक्रिया दिली.

 

See also  गुजरात टायटन्स ने पंजाब किंग्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला..