पुणे :
शिक्षण क्षेत्रात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संस्थेने अमिट ठसा उमटविलेला आहे. उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देणारी ही उच्चशिक्षणातील नवाजलेली संस्था आहे. शिकावे, विसरावे आणि परत शिकावे हि त्रिसुत्री नविन शैक्षणिक धोरणामधे राबविताना महाविद्यालये व विद्यापीठे यांना बदलावे लागेल. शैक्षणिक धोरणाने नविन महाविद्यालये उघडण्याची मुभा ही “scalability व Accessibility ” वाढविता येणाऱ्या महाविद्यालयांना दिली आहे, असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नुतन इमारत उद्घाटन समारंभ दि २१ जुन २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य आणी आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत झाले.कार्यक्रमाची सुरवात प्रा प्रियांका भट यांच्या ईशस्तवनाने झाली. या प्रसंगी वास्तुशिल्प साकारतानाची चित्रफित दाखविण्यात आली.







याप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,” कौशल्य विकास, मातृभाषेतील शिक्षण, परंपरेचा अभिमान, नित्तिमत्ता शिक्षण हे वैशिष्ट्य असलेले नवे शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी १५०० ठिकाणी सुरु झाली आहे. पुढील वर्षापासून सगळ्याच महाविद्यालयात याची अंमलबजावणी होईल.”
सिध्दार्थ शिरोळे म्हणाले,” हि संस्था शिक्षणक्षेत्रात तर काम करतेच पण नागरी विकासाबाबात हि संस्था संवेदनशील आहे.”
प्रा. डाॅ. गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष, पी ई सोसायटी म्हणाले,” वेळीच धाडस केल्यामुळे संस्था प्रगती पथावर गेली आहे. चांगल्या उद्देशामुळे देवाची साथ चांगली मिळाल्यामुळे आज हा दिवस दिसला. उत्कृष्ट शिक्षण तळागाळातील विद्यार्थ्यांना देण्यास हि संस्था कटिबध्द आहे.”
या प्रसंगी नविन इमारतीचे आर्किटेक्ट प्रसाद भाटवडेकर, बिल्डिंग कांट्रक्टर वैभव पाटणकर, बिल्डिंग सुपरवाईझर राजन देवकाते यांचा सत्कार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झाला. आम्रपाली साबळे हिने साकारलेले पोट्रेट देवेंद्रजींना देण्यात आले.
कार्यक्रामाचे प्रास्ताविक प्रा. डाॅ. जोत्स्ना एकबोटे, सहकार्यवाह, पी ई सोसायटी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. शामकांत देशमुख सेक्रेटरी, पी ई सोसायटी यांनी केला. आभार प्रदर्शन प्रा डाॅ राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, माॅडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. डाॅ. निवेदिता एकबोटे यांनी केले.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मा माधुरीताई मिसाळ, गुप्ता, मुरलीधर मोहोळ, भाऊसाहेब जाधव, विविध शिक्षण अधिकारी व पोलीस अधिकारी, विद्यापीठाचे पदाधिकारी यांची होती. याचबरोबर संस्थेचे हितचिंतक याचबरोबर संस्थेच्या सर्व शाळा, महाविद्यालयातील प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, नियामक मंडळाचे सर्व सद्स्य उपस्थित होते.







