पूण्यातून डॉक्टरला अटक …!

0
slider_4552

ISIS दहशतवादी संघटनेसाठी भरतीची होती जबाबदारी, NIA ची मोठी कारवाई

पुणे :

पुण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने मोठी कारवाई केली आहे. ISIS संघटनेच्या रिक्रृटमेंटची जबाबदारी असलेल्या इसमाला एनआयएने अटक केली आहे.
पुण्याच्या कोंढवा परिसरातून डॉक्टर असलेल्या व्यक्तीला NIA कडुन अटक करण्यात आली आहे. अदनाली सरकार असं आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

गेल्या अनेक वर्षपासून पुण्यात राहणाऱ्या या डॉक्टरकडे ISIS मध्ये तरुणांना भरती करण्याची जबाबदारी होती.
डॉ. सरकार याच्या घरातून ISIS संदभात अनेक कागदपत्र सापडली असून काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस देखील सापडले आहेत. तरुणांना दहशतवादी संघटनेमध्ये समाविष्ट करून त्यांचे ब्रेन वॉशिंग करण्याचा सगळा प्रकार डॉक्टर अदनाली करत होता.

आयसिसचे मॉडेल लोकांपर्यत पोहोचवणं ही याची मुख्य जबाबदारी होती. महाराष्टात हे मॉडेल पोहोचवण्यात डॉक्टर अदनाली याचा मोठा हात होता. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईतून तीन आणि ठाण्यातून एका जणाला अटक केलेली आहे.

आरोपींचा इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक ॲन्ड लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅड सिरिया (ISIS), lslamic State in Khorasan सारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणा्या ISIS च्या दहशतवादी कारवायांमध्धे सहभाग होता.

See also  संततधार पावसामुळे पिंपळे सौदागर येथे भूस्खलन होऊन खचला रस्ता…