दिल्ली :
चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. इस्रोने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने माहिती देताना आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, चांद्रयान-3 चे पुढील ऑपरेशन 6 ऑगस्ट 2023 रोजी अंदाजे 23:00 वाजता होणार आहे.







आता 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर ‘सॉफ्ट लैंडिंग’ करण्याचा प्रयत्न करेल. 1 ऑगस्टच्या सुरुवातीला, अंतराळ यानाने ट्रान्स-लूनर इंजेक्शनद्वारे 288 किमी बाय 3.7 लाख किमीची कक्षा गाठली आणि चंद्राच्या प्रभावाच्या क्षेत्रात प्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्राच्या कक्षेत प्रवेश झाल्यानंतर आता चांद्रयान-3 हे चंद्राभोवती एक फेरी मारेल. तसेच 6 ऑगस्ट रोजी रात्री
11 वाजेच्या सुमारास चांद्रयानाला चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत ढकलण्यात येईल.
त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी तिसऱ्या, 14 ऑगस्टला चौथ्या आणि 16 ऑगस्टला पाचव्या कक्षेत ढकलण्यात येईल.
दरम्यान, चंद्रयान 3 ने 14 जुलै रोजी दुपारी २.३५ मिनिटांनी
आवकाशात झेपावलं होतं. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यान प्रक्षेपित करण्यात आलं होतं. चांद्रयान-३ 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरल्यानंतर त्याचं खरं काम सुरु होईल. हे यान इस्रोमध्ये बसलेल्या वैज्ञानिकांना चंद्राबदइल माहिती पाठवेल.
त्याचबरोबर पाण्याचीही माहिती समोर येणार आहे.
चांद्रयानाबदल माहिती चांद्रयान-3 मोहिमेचे तीन प्रमुख मुद्दे आहेत. ‘प्रपल्शन, लॅँडर, रोव्हर. या मोहिमेचा एकूण खर्च 600 कोटी रुपये इतका झाला आहे. या मोहिमेसाठी वेगवेगळ्या विभागातील शेकडो वैज्ञानिकांनी सहभाग
नोंदवला आहे.








